Chapter 36

“किती वेळ झाला आहे? .. तू कुठे आहे? .. किती फोन लावत आहे. काय करत होता?. वेळे चा भान नाही… किती मी वाट पाहत होतो. तुझी गरज असते तेंव्हा मात्र तू नसतेस.. तुला मात्र फक्त तुझ काम महत्त्वाचे वाटते. कुठे होतीस? ” राहुल चे प्रश्न संपता संपत नव्हते.
“अरे हो हो शांत हो, वैतागतो का एवढा बाबा, आहे मी इथेच. जरा कामात अडकले होते. TL समोर होता, कस बोलणार बाबा. तो सारखं बघत होता. शेवटी एकदाच काम संपल. बोलूयात आता.. शांत हो जरा.”
आज राहुल ऑफिस मध्ये जरा निवांत होता म्हणजे जास्त काम नव्हते म्हणून लग्न अन विधि चा विचार करत बसला होता. 4 दिवसानी सह परिवार विधिला लग्नासाठी मागणी घालण्यासाठी जाणार होता.

राहुल “बर ऐक, आम्ही शनिवारी सकाळी 10 पर्यंत पोचू. आता आई सोबत बोलणे झाले. ती सगळी तयारी करत आहे. काय काय सांगत होती. अन विचारत होती ‘सूनबाई ला स्वयंपाक येत ना रे?”
विधि “मग तू काय सांगितला”
राहुल “मी बोललो की आई तू शिकव की ती आल्या वर”
विधि “ये मला येते बर का स्वयंपाक.. उगीच आई ला काय पण सांगतो, काय वाटेल आई ना. ”
राहुल “हो बाबा, तुला स्वयंपाक येते , सांगेन तस आई ला. ”
विधि “अरे ऐक ना, TL येत आहे आपण नंतर बोलूयात ”
म्हणत विधि ने फोन कट केला.

राहुल थोडा वेळ विचार करून मग तो आपल्या कामात मग्न झाला. पण दूर शेवट च्या डेस्क वर बसलेल्या करुणा चे लक्ष्य राहुल कडे होता. बहुधा तिला तिच्या मनात काय चालू आहे नीट उमजत नव्हता. ती त्याच्या कडे टक लावून बघत होती पण ती आपल्याच विचारात मग्न होती. राहुल आपल्या कडे बघत आहे हे लक्षात आल्यावर ती भानावर आली. काय बोलावं काय करावं कळले नाही म्हणून ईकडे तिकडे बघण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली. खर तर राहुल ते पुढे वाढवत न्यायचे नव्हते म्हणून तो ते दुर्लक्षित करत होता. तो आता फक्त शनिवार कधी येते त्याचा तो वाट पाहत होता. मोजून चार दिवस राहिले होते. राहुल खूप खुश होता, अगदी तिला पहिल्यांदा पाहिला तेव्हा पासून सगळे दिवस तो आठवत होता, तीच हसणे, तिचे बोलणे, ते कॅन्टीन मध्ये केलेला प्रपोज, टेकडी वर गेले ते सगळ्या गोष्टींचा तो आठवण करत बसला होता.
“अरे राहुल चल येणार नाही का.?” अजिंक्य अक्षरशः हाक मारून राहुल ला भानावर आणला. दोघे मिळून ऑफिस बाहेर पडले.

Published by hrishikesh.chabukswar@art

In single line, I simply follow my heart ♥

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started