Just thought

फोन मधे एवढे नंबर आहेत की लिस्ट स्क्रोल केला ना हजारो दिसतील पण कोणाला मनातला बोलाव अस एक नंबर भेटत नाही. हज़ारों नंबर मोबाइल मधे घेऊन फिरतो आपण, पण एक नंबर भेटू नये ही शोकांतिका आहे. कटू असला तरी सत्य आहे.
किती प्लास्टिक जिवन जगात आहोत आपण अस वाटत राहते. लोकांची गर्दी फक्त दिसायला आहे मन मोकळे करायला नाही याची जाणीव झाल्या शिवाय राहत नाही. गंमत पहा कशी आहे, सर्वांना असच वाटते की इथे कोणी ही कोणा चा नाही. आश्चर्य वाटेल पण हीच वस्तुस्थिती आहे. मग खरच कलयुग आहे याची प्रचिती येते. अश्या ही परिस्थिती जर कोणी एखादा, खांदा दिला तरी नंतर तोच व्यक्ति केलेल्या उपकाराची सौदा करतो, हो की नाही, बरोब्बर वाटत आहे ना, वाटणारच. हेच ते दुर्दैव आहे. कोण आपल्या ला कस लुबाडेल या भीती ने आपण खरच दगड बनलोय. आणि या भावनेत स्वतःला कोंडून घेतले आहे याची जाणीव होत. काही कळल नाही ना, सांगतो, एक प्रश्न राहतो आपण जे जगतोय ते योग्य जिवन जगत आहे की अजून काही वेगळे जगता येईल?
उत्तर आहे जगता येत, हिम्मत आणि चांगले विचार सोबत असेल की किमान जगण्याचा आनंद घेता येते. हे अस फक्त मला एकट्या ला वाटत असेल का, तुम्हाला पण वाटते ना, किमान आता तरी या घडी ला वाटत असणार, मग जरा हिम्मत करा, भीत भीत जगण्याची सवय मोडा आणि मग निस्वार्थ होऊन कोणाचा तरी दुख वाटून घ्या, एखाद्याची ऐकून घ्यायला कोणी नसेल तर त्यांच ऐकून घेणारे कान बना,
कोण तडफडत असेल तर मला त्यांचे तडफड ऐकणारे कान बना आणि आपल्याला फक्त खांदा बनायचे आहे त्याची सौदा करायचे नाही जाणीव ठेवा.
त्यांच दुख घालवू शकत नाही पण कमी करू शकतो. त्यांच्या चेहर्‍यावर ची स्मायल तुम्हाला समाधानी देऊन जाईल, जीवन जगणे सत्कारणी लागेल. त्यांच्या चेहर्‍यावरचे समाधान बघून आपल्याला किती समाधान मिळेल हे केवळ शब्दात व्यक्त करणे जरा कठीण आहे. त्याची तुम्ही अनुभव घ्याच. पावित्र्य काय असते याची जाणीव झाली नाही तर मग बोला. ती एक अनुभुती आहे. एकदा घ्या

Chapter 44

Last chapter

आई ने दिलेल्या नंबर वर राहुल कॉल केला, ती मुलगी फ़ोन उचलून “हॅलो कोण?”
राहुल” मी राहुल कदम, तुम्ही रजनी बोलत आहात का?”
रजनी” हो मी रजनी, बोला ”
राहुल”आई बोलली आहे तुम्हाला भेटायला, आज तुम्हाला वेळ असेल तर भेटायचे का?”
रजनी “हो चालेल, कुठे भेटायचे ”
राहुल ला एक क्षण वाटले त्या टेकडी वर भेटावं पण स्वतःला सावरत तो तिला एक ठिकाण अन वेळ सांगून फोन कट केला.

ठरलेल्या ठिकाणी, ठरल्या वेळी तो पोचला. ती मुलगी अजून तिकडे पोचली की नाही हे जाणून घेण्यासाठी साठी तिला कॉल केला तर पण ती फोन घेत नव्हती. थोड्या वेळात रजनी फ़ोन करून “येत आहे” अस सांगून फ़ोन कट केली. तोपर्यंत करुणा सोबत बोलाव म्हणुन तो करुणा ला कॉल केला पण तिचा नंबर बंद होता. दोनदा तीनदा प्रयत्न करून बघितला पण लागत नाही म्हणून निराश झाला.
थोड्या वेळाने त्याचा फ़ोन वाजला. रजनी चा कॉल होता, तो उचलला “हॅलो कुठे आहे”
रजनी” मागे वळून बघ”
राहुल फोन खाली घेत मागे वळून बघितला तर समोर करुणा उभी आहे
राहुल ला काय घडत आहे कळण्याआदी करुणा हसली आणि बोलायला सुरू केली “मला इथे पाहून तुला धक्का तर बसला नाही ना, रजनी वैगरे कोण नाही!
राहुल, तुझ जरी प्रेमावर चा विश्वास उडाला असला तरी माझ अजून ही विश्वास आहे. मी ही तुला मिळविण्यात हरले असते तर माझा ही विश्वास उडाला असता. तु पुन्हा प्रेम करणार नाही अस स्वतःला सांगितला होता ते मला जाणवत होता. कोणा एका व्यक्तीने धोका दिला म्हणून प्रेम करने चुकीचा असत अस गृहीत धरून तू जात होता. तुझे ते मत मोडीत काढणे अवघड होता. तु माझ प्रेम आहेस, माझ्या आदी ती तुला भेटली त्यात कोणाचा दोष नाही आणि म्हणून मी मधे येत नव्हते पण आता तीच नाही तर मला माझ प्रेम मिळवायच पूर्ण अधिकार आहे आणि ते ही तुझ्या मताशी तडजोड न करता. तु कोणा एका अन ओळखी मुलीशी लग्न करण्यापेक्षा, तु तुझ्या या मैत्रिणी सोबत लग्न करशील का? ”
क्षणभर राहुल हसला, त्याला सगळे प्रकरण नीट उमगला, रजनी दूसरी तिसरी कोण नाही, करुणा च आहे. तिच्या बोलण्यातून तीच त्याच्या वरच प्रेम जाणवत होता. तिने प्रेमासाठी एवढ सगळे काही केली होती. तिच्याकडे बघत राहुल बोलला ” तू हे कस जुळवून आणली ”
करुणा” बहुत लंबी कहानी है RK, जल्दी क्या है, मेरे साथ चलो, मै ये कहानी तुम्हें जिन्दगी भर सुनानी वाली हूँ ”

समाप्त

Chapter 43


विधि पासून वेगळे होऊन आता सहा महिने झाले होते. या सहा महिन्यात ती बरेचदा बोलण्याचा प्रयत्न केली पण राहुल तिला अजिबात बोलला नाही. तो स्वतःला कामात गुंतून घेतला होता. दरम्यानच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या होत्या. विधि अविनाश ला दोषी धरून त्याला थोबाडीत मारले होते अस राहुल ला कळल होते. इकडे राहुल आपल्या घरच्यांना म्हणजे आई बाबाना घडलेला सगळे प्रकार सांगून कस बस सगळ्या लोकांना शांत केला होता. चुक राहुल केला होता पण त्रास मात्र घरच्याना झाला होता. घरचे नाराज झाले होते. राहुल चे बाबा आता राहुल ला लग्न कर म्हणून मागे लागत होते. इकडे करुणा सोबत ची मैत्री आहे तसाच टिकून होती. तिने नाही म्हंटलं तरी त्याला खूप सांभाळून घेत होती. ती मैत्री मना पासून टिकवत होती. खूप काळजी घेत होती.

एक दिवस राहुल चे बाबा राहुल ला फोन करून सांगितले की ‘तुझ्यासाठी एक मुलगी बघितली आहे. मुलगी छान आहे. या रविवारी तिच्या घरी जाऊन सगळे जण बघून येतो. सगळे काही ठीक राहिला तर तु ही एकदा भेट घे अन्‌ सांग तुझ मत मग नंतर बाकीचे आम्ही बोलून घेतो.’ बाबा ना नाही म्हणून दुखवायचा नव्हता म्हणून राहुल ‘हो बाबा तुम्ही जस म्हणाल तस’ म्हणत फोन ठेवला.
ठरल्या प्रमाणे सगळे रविवारी मुलगी बघून आले, सायंकाळी आई फ़ोन करून सगळे काही सांगितली. ‘मुलगी छान आहे, घरचे पण खूप छान लोक आहेत. मुलीचे वडील पोलीस अधिकारी आहेत, तुझ्या बाबा चे सांगली चे ते मित्र नाहीत का घोळके काका त्याच्या मित्राची मुलगी आहे. पुण्यात असतात. सगळ्याना मुलगी पसंत आहे. तुमची जोडी शोभून दिसेल. ते मुली चे फोन नंबर दिलेत. तीला भेट वेळ काढून.’ राहुल इतका उत्साही नव्हता पण आई खूप आग्रह करत आहे म्हणून ‘हो’ बोलून फ़ोन ठेवला.
करुणा ला हे सांगाव की नको, तिला काय वाटेल, पण नाही सांगितले तर ती चिडेल का, सांगाव तरी लागेलच. दूसरी कडून कळण्यापेक्षा मी सांगितलेले बर होईल म्हणून तो करुणा ला फोन केला.
करुणा ला कॉल केला, ती फोन उचलून “हॅलो राहुल, बोल”
राहुल ” करुणा ऐक ना भेटू शकते का आता”
करुणा ” अरे भेटले असते, पण मैत्रिणी सोबत बाहेर आले, तु बोलना आता, काय झाला आहे? सगळ ठीक आहे ना?”
राहुल “अग हो काय नाही, सगळे ठीक आहे. आज आई बाबा माझ्या साठी एक मुलगी बघायला गेले होते.”
करुणा “अरे वाह, कोण आहे, कशी आहे म्हणे मुलगी”
राहुल “अग कोण काय माहीत नाही, आई बोलली छान आहे जाऊन भेटून घे एकदा, पण मला काय भेटायची इच्छा नाही”
करुणा ” राहुल, भेटल्या शिवाय, आदीच कस ठरवत आहे, एकदा भेट तरी ”
राहुल ” आई सांगत होती मुलगी बाबांना पसंत पडली आहे, तिला भेट अस म्हणत होती”
करुणा “भेट ना मग ”
राहुल ” मला इच्छा नाही ”
करुणा “राहुल अस करुन कस चालेल, ती मुलगी आपल्या आई बाबाच्या विश्वासावर अंधळा विश्वास ठेवून तुला भेटायला तयार आहे, तिचा विश्वास तोडू नको. भेटायला गेला नाही तर तिला किती वाईट वाटेल जरा विचार कर ”
राहुल “हो बाबा ठीक आहे, भेटून येईन, तस ही मला आता बाबांना नाराज करायचे नाही”
करुणा “राहुल.. ” करुणा ला खर तर ते ऐकून धक्का बसल्या सारखं झाले होते.
राहुल” हां बोल ना काय म्हणतेस ”
करुणा” काय नाही, बोलू आपण नंतर”

Chapter 42

करुणा ऑफिसला जाण्यासाठी निघाली तेंव्हा देवाला नमस्कार केली, मनातल्या मनात काय तरी मागितली. ऑफिसला येऊन पोचली. कोणाला कळणार नाही अस चोहोबाजूंनी नजर फिरवली पण राहुल कुठेच नजर आला नाही. दोन दिवस झाले राहुल ला भेटली नव्हती. काल तर राहुल ऑफिस सुद्धा आला नव्हता.
ती येऊन आपल्या डेस्क वर बसली. राहुल ला सोडले तर बाकी सगळे जण आले होते. इतक्यात राहुल आला, चेहरा स्थिर पण गांभीर्याने ने भरला होता. तिला काळजी वाटत होतीच. आता कधी एकदा त्याला भेटून काय झाला आहे विचारपूस करायची होती. अजिंक्य ला इशारा करून ती कॉफी प्यायला चल बोलली. ती स्वतःच राहुल कडे आली, बोलली “चल कॉफी घेऊन येऊया”. राहुल उठला नाही म्हणून ती पुन्हा बोलली, “राहुल तु येतोय ना?”
राहुल गप्प उठला अन तिच्या मागे मागे चालू लागला. तिच्या बोलण्यात काळजी होती अन्‌ तेवढाच राग दिसत होता. राहुल स्वतः च्या दुनियेत वावरत होता. त्याला कोणाला बोलण्यात रस नव्हता अन्‌ नाही कोणाला त्रास सांगायचे होते. पण करुणा च्या बाबतीत तो अस करू शकेल का याची स्वतःला च खात्री नव्हती.
झाल ही तसच, ती कॅन्टीन मध्ये पोचल्या पोचल्या एका नंतर एक 100 प्रश्न विचारात होती. “राहुल काय झाला आहे सांगशील का, मला काळजी वाटत आहे” राहुल बराच वेळ शांत बसला मग फ़ोन मधले ते ऑडिओ रेकॉर्डिंग अन्‌ sms तिला दाखवला. ते बघून झालेला सगळे प्रकार तिच्या लक्षात आले होते. काल दिवसभर कुठे होता अन्‌ काय प्रकार घडला असेल हे तिला ते sms बघून च कळल होता. तिला परिस्थिती समजत होती. राहुल ला आता तिची तरी गरज आहे हे करुणा ला उमगला होता. ती त्याला काय बोलणार इतक्यात राहुल बोलला “करुणा, माझ विश्वासघात झाला आहे अन्‌ मला आता कोणावर विश्वास बसणार नाही. लहानपणा पासुन ऐकत आलो आहे की प्रेम आंधळ असते. पण आता मी कोणावर आंधळ्या पणाने विश्वास ठेवू शकणार नाही तर मग मी कोणावर पुन्हा कस प्रेम करू शकेन?”
करुणा ला त्याच्या बोलण्यातला ओघ कळाला होता. जर मी याला प्रपोज केले तरी तो माझ्या वर प्रेम करतो हे आता बोलू शकत नाही.’विधि नाही म्हणून काय झालं आता करुणा तरी आहेच की’ अस तो विचार करत नाही. विधि असती तर तो मला कधी भेटला नसता हे मला ही माहीत आहे अन्‌ त्याला ही माहित आहे. म्हणूनच तो आता माझा प्रेम मान्य करू शकणार नाही. करुणा स्वतः ला काय तरी सांगून, विचार करून राहुल ला बोलली “राहुल आपण फक्त मित्र आहोत, मी जरी प्रेम करत असले तरी तु मला आता विधि नाही म्हणून तुझ माझ्या कडे येणे आवडणार नाही. तुला ही आता आंधळ्यापणे प्रेम जमणार नाही हे समजते मला, आपण मित्र आहोत अन्‌ फक्त मित्रच राहणार”

Chapter 41

बस पुण्यात स्वारगेट ला येऊन थांबली तसा राहुल जागा झाला मोबाईल फोन वर किमान 50 च्या आस पास sms आले होते. सगळे चे सगळे विधि ने पाठवले होते. एक ही sms न वाचता तो सरळ घर गाठली. दिवसभर चा ताण आणि प्रवास याने तो फार थकला होता. त्याच्या अंतःकरणाला वेदना होत होते. भान हरपला जात होता. किमान दुःख कोणाला तरी सांगाव अस त्याला वाटत होता म्हणून तो फ़ोन हातात घेतला, करुणा का कॉल करू लागला, पण अचानक त्याला वाटले की मी तिला का सांगत आहे. ती काय विचार करेल, नको करायला म्हणुन तो कॉल कट केला. फ़ोन बाजूला ठेवून तो बेड वर उशीत तोंड खुपसून झोपी गेला.

रात्री चे 9 वाजले होते तेंव्हा त्याला जाग आली. विजय दार वाजवत होता म्हणून जागी आली. दोघांना एकत्र जेवायला जायची सवय होती. आज ही दोघे एकत्र जेवले, विजय ला काय कळू नये याची तो खूप काळजी घेत होता. आजारी असल्याचा बहाणा सांगितला. दोघे आप आपल्या घरी निघून गेले. घरी आल्यावर काय करायचे आता अस प्रश्न होता. नेहमी प्रमाणे तो आता विधि ला sms कॉल करणार नव्हता. एकटा आहे, आपलं कोण नाही असे भावनांचा कल्लोळ चालू होता. रोज आपल वाटणार घर आज खायला उठला आहे अस वाटत होत. फ़ोन हातात घेऊन तो विधि चे sms वाचू लागला.

वाचून झाल्यावर त्याला एवढ च कळल की तिला वेळ देत नव्हतो म्हणून ती त्या अविनाश सोबत बोलत होती मग बोलता बोलता कधी त्याच्यात गुंतली हे तिलाच कळल नाही. ती त्याला प्रेम करत नाही. ती एकदा माफ कर म्हणुन विनवण्या करत होती. राहुल विचार करत होता की वेळ देत होतो तर बोलली की कामावर लक्ष दे, तिचे ऐकून काम वर लक्ष दिला तर अस धोका दिली.
तिचे खूप सारे कॉल येते होते, माफी चे sms येते होते. ती तीच चूक मान्य करून पुनः पुन्हा माफी मागत होती. इकडे राहूल स्वतःला एक प्रश्न विचारात होता ‘तिच्या ठिकाणी राहुल अस केला असता तर विधि त्याला माफ केली असती का?’

Chapter 40

राहुल इकडे तिकडे बघत होता. इतक्यात त्याला अविनाश दिसला तस त्याला विधि ही दिसली. दोघेही आपल्या धुंदी मध्ये होते. राहुल हे सर्व प्रकार आता स्वतःच्या डोळ्याने पाहत होता. राग अनावर झाला होता. तिला जाब विचारावा म्हणुन तो तिच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले पण क्षणात स्वतःला सावरला अन्‌ एक टेबल वर येऊन बसला. तिला sms केला ‘काय करत आहेत?’
तिचा फोन वाजला नाही पण फ़ोन तिच्या हातात होता. तिने काय तरी खेळल्या सारखं केली. परत अवि सोबत गप्पा मारत बसली. अविनाश ब्रेकफास्ट करत होता. राहुल ला विधि चा sms आला. राहुल तडक उठला, ते बसलेत तिकडे पोचला तिच्या समोर येऊन उभा राहिला. अचानक ध्यानी मनी नसताना राहुल ला समोर बघून ती पुरती गांगरून केली. तिचा चेहेरा पडला, हात पाय गळून पडले होते. तोंडातून शब्द फुटत नव्हते.
काय बोलाव हेच तिला सुचत नव्हते. तिच्या हाव भाव वरुन तीच चोरी पकडली गेली होती. ती एकदा राहुल कडे तर एकदा अविनाश कडे बघत होती. तिला अक्षरशः घाम फुटला होता. आता राहुल काय करेल, काय बोलेल? काय सांगू त्याला. तो इकडे अचानक कस आला?
राहुल एक ही शब्द बोलला नाही तसाच उभा होता.. त्याच त्रास, मनाची वदना त्याच्या डोळ्यात दिसत होते, डोळे बोलत होते. तो मात्र अबोल होता. हातातला फ़ोन समोर केला विधि चा sms होता ‘ऑफिस मध्ये आहे बाबा, काम करत आहे, तू काय करत आहेत?’ ती हे वाचली, ती काय बोलण्याच्या आदी च तो फ़ोन मागे घेतला, फ़ोन मध्ये काय तरी केला अन्‌ फोन मधून काय तरी आवाज ऐकू येत होता. ते आवाज दोघांचे संभाषण चे होत. तिला ते स्पष्ट ऐकू येत होता.
अवि “हाय बेबी, काय करत आहे? ”
विधि “हाय अवि, अरे काय नाही, आता सगळं आवरून झाले. तुला कॉल कर अस sms करणारच होते तेवढ्यात तु कॉल केला.”
अवि “विधि, मी तुला खूप खूप मिस करत होतो”
विधि “अवि, मी पण खुप मिस केलं तुला. कधी एकदा बोलते अस झालेला”
अवि “I मिस यू too बेबी, उद्या चे काय प्लॅन आहे, सुट्टी टाकून फिरायला जाऊया कुठे तरी, काय म्हणतेस?”
विधि “उद्या कस शक्य आहे अवि, सुट्टी भेटणार नाही, आधीच मी शुक्रवार चे सुट्टी टाकली आहे. ”
अवि “मी बघेन ते सगळ काही, तु तयार आहेस का सांग फक्त? ”
विधि “हो बाबा, तु सगळ सांभाळून घेणार असेल जाऊया, शेवटी तू टीम लीडर आहे, नक्की जाऊया ”
अवि “मी प्लॅन करतो आणि सकाळी सांगतो कधी अन कुठे जायचे आहे ते.”
विधि” हो तु नीट प्लॅन कर, मागच्या वेळे सारखं करू नको”
अवि” हो मी नीट प्लॅन करतो, चल आता झोपू, उद्या दिवसभर फिरायचे आहे. ”
विधि “हो चल झोपू,”
अवि “i love you, गुड नाईट बेबी”
विधी ” i love you too अवि, गुड नाईट ”

ती हे सर्व बोलणे ऐकली, राहुल कडे बघायचे तीच हिम्मत होत नव्हती. तो मात्र अजून ही एक शब्द बोलला नव्हता. अबोल होता. त्याच अबोल तिला खटकत होता. ती त्याच्या कडे बघत होती. त्याचे डोळ्यात अश्रू होते पण बाहेर येत नव्हते. तो त्याचे सगळे वेदना फक्त डोळ्यात कैद केला होता. त्यांना बाहेर पडू द्यायचा नाही यासाठी तो आटोकाट प्रयत्न करत होता. तो काय बोलत नाही म्हणून ती बोलणार तेवढ्यात तो तिथून निघून गेला. एकदा ही वळून बघितला नाही. ती रागाने अविनाश कडे बघितली अन्‌ ज्या दिशेने राहुल गेला त्या दिशेने त्याच्या पाठी मागे गेली. “राहुल एकदा ऐकून घे माझ, तुझ गैरसमज झाला आहे” अस हाक मारत ती त्याच्या मागे धावत होती. तो मात्र एक ही शब्द न बोलता ऑटो रिक्षा मध्ये बसला अन्‌ निघून गेला.

Chapter 39

पहाटे 5 ची ट्रेन पकडून राहुल ठीक 9 सुमारास मुंबई गाठली. एक क्षण ही त्याला शांत बसणे जमत नव्हता तरी स्वतःला सावरत तो स्वतःला शांत ठेवायचे प्रयत्न करत होता. ठरल्या प्रमाणे तो अविनाश ला मुंबईत आल्याचे कळविले. अविनाश ही ते दोघे कुठे भेटायचे ठरवले आहेत हे sms द्वारे पत्ता पाठवले. राहुल ऑटो रिक्षा ला हाक दिली, आत बसला आणि ऑटो दिलेल्या पत्त्या कडे निघाली. आतून राग, विचारांची गोंधळ अन्‌ बाहेर शांत अन्‌ स्थिर होता. डोळे लाल होते, केस विस्कटलेले होते. नेहमी प्रमाणे आज कपाळावर अर्ध चंद्रकोर नव्हता. सकाळची वेळ होती म्हणून ट्राफिक जाम होती. ऑटो रिक्षा सारखं सिग्नल वर थांबत थांबत जात होती. एक एक क्षण स्वतःला शांत ठेवणे अवघड होत होता. ज्याच्यावर जिवा पाड प्रेम केले आहे ती व्यक्ती अस धोका देईल अस क्षण भर सुद्धा विचार मनात डोकावला नव्हता. हृदयात एक प्रकार चा त्रास सतत होत होता. डोळ्यासमोर अंधार आल्या सारखं होतं होता. तिच्या सोबत घालवलेल्या सगळे क्षण आठवत होते. तिची ती पहिली भेट, तिचे ते लाडाने बोलणे, टेकडी वर जाऊन आले ते दिवस, तिने अचानक दिलेली भेट, तिने मिठी मारून i love you बोललेले क्षण एक एक करून डोळ्या समोर येत होते. ती तर आपल्या वर प्रेम करत होती तर मग हे कस घडल? अस तो स्वतःला नकळत असंख्य प्रश्न विचारत होता.

अविनाश अन विधि आज ठरल्या प्रमाणे सुट्टी घेऊन बाहेर फिरायचे बेत आखले होते म्हणजे त्यातल्या त्यात विधि ला तरी अस वाटत होत. ती ठरल्या ठिकाणी पोचली. अविनाश आदीच तिकडे येऊन वाट पहात उभे होता. दोघे भेटले. हातात हात घालून कार च्या दिशेने निघाले. विधि नेहमी प्रमाणेच राहुल ला ऑफिस ला पोहचल्या चे sms आदीच केली होती. दोघे कार मध्ये बसले. अविनाश “विधि, काय तरी खाऊन घेऊया का? मला जाम भूक लागली आहे”
विधि “हो चालेल, आदी काय तरी खाऊन घे. मला तस भूक नाही, येताना मी ब्रेकफास्ट करून आले रे.”
एक वेळ टक लावून तो तिच्या कडे बघितला, तिचा निरागसता, तिचे गोड बोलणे कोणाचे ही हृदय क्षणात घायाळ करणारे होते. जीन्स, पांढरा रंगाचा T शर्ट वर फिक्कट निळ्या रंगाचा जॅकेट एकंदरीत ती एखाद्या पिक्चर मधली हीरोइन दिसत होती. अविनाश तिला घेऊन ठरलेल्या पत्त्यावर पोचला. सांगितलेल्या हॉटेल मध्ये तिला घेऊन गेला. दोघेही एका टेबलवर बसले. अविनाश काय तरी ऑर्डर दिला. दोघे ही बोलत मनसोक्त गप्पा मारण्यात गुंग होते. विधि चे बडबड ऐकत अविनाश राहुल येण्याचा वाट पाहत होता. तेवढ्यात राहुल हॉटेल मध्ये शिरला.

Chapter 38

तो व्यक्ती “हाय बेबी, काय करत आहे? ”
विधि “हाय अवि, अरे काय नाही, आता सगळं आवरून झाले. तुला कॉल कर अस sms करणारच होते तेवढ्यात तु कॉल केला.”
आवाज विधि चा होता, जे काही चालू आहे हे सगळे काही विश्वास न बसण्या सारखं प्रसंग होते. आता थोड्या वेळा पूर्वी झोपायचे म्हणून दोघे फोन ठेवले होते. राहुल च्या चेहर्‍यावर चे भाव बदलत होते, दुःख त्याच्या चेहर्‍यावर उठून दिसत होत पण तो हे सगळ प्रकार मुकाट पणे सहन करत सगळे बोलणे नीट ऐकत होता.
तो व्यक्ती” विधि, मी तुला खूप खूप मिस करत होतो”
विधि “अवि, मी पण खुप मिस केलं तुला. कधी एकदा बोलते अस झालेला”
तो व्यक्ती “I मिस यू too बेबी, उद्या चे काय प्लॅन आहे, सुट्टी टाकून फिरायला जाऊया कुठे तरी, काय म्हणतेस?”
विधि “उद्या कस शक्य आहे अवि, सुट्टी भेटणार नाही, आधीच मी शुक्रवार चे सुट्टी टाकली आहे. ”
तो व्यक्ती म्हणजे अवि “मी बघेन ते सगळ काही, तु तयार आहेस का सांग फक्त? ”
विधि “हो बाबा, तु सगळ सांभाळून घेणार असेल जाऊया, शेवटी तू टीम लीडर आहे, नक्की जाऊया ”
अवि “मी प्लॅन करतो आणि सकाळी सांगतो कधी अन कुठे जायचे आहे ते.”
विधि” हो तु नीट प्लॅन कर, मागच्या वेळे सारखं करू नको”
अवि” हो मी नीट प्लॅन करतो, चल आता झोपू, उद्या दिवसभर फिरायचे आहे. ”
विधि “हो चल झोपू,”
अवि “i love you, गुड नाईट बेबी”
विधी ” i love you too अवि, गुड नाईट ”

इतका वेळ ते संभाषण ऐकत असलेला राहुल शेवटच्या दोन वाक्याने पुरता खचला होता. थोड्या वेळा पूर्वी राहुल ला i love you बोललेली विधी आता अवि नावा च्या कोणत्या तरी व्यक्ती ला i love u बोलत आहे. त्याला त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तो अजून ही ती अस करेल या वर विश्वास ठेवायला तयार नव्हता. पण जे काय त्याच्या कानाने ऐकले आहे त्याला त्याच सोक्षमोक्ष लावायच होत. पण कस लावायची याच विचाराने तो ग्रासला होता. सगळा प्रकार राहुल च्या लक्ष्यात येत होत पण तरी एक गोष्ट अजून ही विश्‍वास न ठेवण्यासारखं होत, ते म्हणजे विधि अस माझ्या सोबत कसे करू शकते. ती अस का केली, लग्नाच्या गोष्टी चालू आहेत, अवघ्या 4 दिवसात तिच्या घरी जाऊन रीतसर मागणी घालण्यासाठी राहुल चे कुटुंब तयारी करत आहे. किती काय काय सांगून राहुल घरच्यांना तयार केला होता, सगळे काही मातीत गेल्या सारखं वाटत होतं. राहून राहून वाटत होते की माझ्या सोबत अस का होत आहे. अस काय चूक झाली माझ्या कडून की ती अस मला धोका दिला. आता त्याला ती अस का केली याचे उत्तर हवे होते. त्यासाठी तो आता तडफडत होता.
अवि “राहुल, तुला समजल का, ती आता माझी गर्ल फ्रेंड आहे, तू पुन्हा तिला फोन करायचे नाही.”
राहुल “हो, तू जो कोणी आहे मला माहीत नाही, मला हे सर्व काही आलबेल आता कळले आहे. तुझ्या माहिती साठी सांगतो, मी माझ्या परिवार सोबत शनिवारी तिच्या घरी जाणार होतो, तिला लग्नासाठी मागणी घालायला. पण तुझ्या मुळे मला तीच खर रूप बघायला मिळाले, तुझ्या मुळे माझे डोळे उघडले, धन्यवाद मित्रा”
अविनाश ” लग्न वैगरे गोष्टी होत आहेत हे मला अजिबात माहित नाही. ती मला बोलली, तुमच ब्रेक अप झाले आहे तरी तू तिला कॉल करुन त्रास देतो”
राहुल “ती तुला ही धोका देत आहे, खोट सांगत आहे, तुला तीच खर रुप बघायचे असेल तर एक काम कर, मी सांगतो तस कर”
बहुधा अविनाश सुद्धा तिच्या लग्नाची गोष्ट ऐकून आश्चर्य झाला असेल कारण तो जरा मावळ पणे बोलत होता.
अवि “काय मदत करू शकतो”
राहुल त्याला सगळ नीट अन सविस्तर पणे सांगून एक विनंती केली “तिला अजिबात काळू देऊ नको”
अविनाश ला म्हणजे विधि चा ऑफिस मधला टीम लीडर, एकूण एक एक प्रकार लक्ष्यात आला होता. त्या मुळे तो मदत करायला तयार झाला.

Chapter 37

जेवण झाल्यावर राहुल अन विजय दोघेही मेस मधून बाहेर पडले. साधारण 9 च्या आसपास, दोघेही पायी पायीच चालत घरा कडे निघाले. गप्पा मारत होते, इतक्यात राहुल चा फोन वाजला. विजय हसला, “चल भाई एन्जॉय कर” म्हणत तो निघून गेला. “चल उद्या भेटू म्हणत तो पुढे चालत फोन वर बोलत घरा कडे निघाला.
साधारण तास दोन तासभर बोलून झाल्यावर ते दोघे एकमेकांना i love u म्हणत फोन ठेवले. दोघेही एकमेकांना खूप छान बोलत होते. चेहरा पाहूनच त्यांच आनंद सगळ्यांना उमजले असते इतकी ते दोघे खुष होते. बोलत बोलत तो कधी च घरी पोचला होता.
फोन ठेवून झाल्यावर तो बेड तयार करून झोपणार तेवढ्यात फोन परत एकदा कडाडला. ‘काय झालं आता, विधी परत एकदा का फोन केली’ अस म्हणत तो फोन कडे गेला. फोन एक नवीन नंबर वरुन होता.
राहुल “हॅलो, कोण आहात?” अस अगदी नम्र पणे तो त्या त्या व्यक्तीला विचारला.
तो व्यक्ती “तु राहुल ना?”
राहुल “हो आपण कोण आहात?”
तो व्यक्ती “मी कोण ते सोड, तु विधि ला का परत फोन करतो, मागच्या महिन्यात तुमचे ब्रेकअप झाले आहे ना?”
क्षणात सगळे जग गरगर फिरल्या सारखं राहुल ला भास झाला. स्वतःला सावरत तो त्या व्यक्तीला बोलला “तिच्या बद्दल बोलणार तू कोण? ऐकून घेतोय म्हणून काय वाटेल ते बोलायचे हिम्मत करू नको, आहेस कोण तू?”
तो व्यक्ती “माझ सोड, तु तिला परत फोन करायचे नाही. ती आता माझी गर्ल फ्रेंड आहे.”
सगळे सुरळीत सुरू असताना काय तरी अस होईल अस ध्यानी मनी नसताना तो अनोळखी व्यक्ती सगळे काही उध्वस्त करू पाहत होता.
पण राहुल जरा ही स्वतःला विचलित होऊ न देता त्या व्यक्तीला ठाम पणे बोलत होता “हे बघ तू कोण आहे मला माहीत नाही, पण हे सर्व प्रकार जर फक्त एक जोक म्हणून करत अससील तर हे मजाक मस्ती ची गोष्ट नाही. आणि मला कोणत्याही अनोळखी व्यक्ती सोबत तिच्या बद्दल बोलायची गरज नाही”
असे म्हणत राहुल फोन बंद केला.
पुन्हा एकदा फोन कडाडला, त्याच व्यक्तीने पुन्हा एकदा फोन केला होता, आता तो व्यक्ती जो कोणी असेल त्याला सोडायचे नाही अस स्वतःला बजावत तो फोन उचलला “तुला एकदा सांगितल्या वर समजत नाही का.. आहे कोण तु तिच्या बद्दल बोलणारा? ”
तो व्यक्ती “तुला पुन्हा एकदा सांगतो विधि माझी गर्ल फ्रेंड आहे, तु तिला परत फोन करायचे नाही”
राहुल “हे बघ तू कोण आहे कळलेच मला, पण ध्यानात ठेव हे तुला खूप महागात पडेल, आम्ही दोघे खूप लवकर लग्न करणार आहोत, म्हणून तुला सांगतो नीट जपून बोल”
तो व्यक्ती “मी जे बोलत आहे त्या वर तुझे विश्‍वास बसेना का, मी तुला प्रूफ देऊ शकतो, पण एक अट आहे तुला मी कॉन्फरन्स मध्ये घेतो तिच्याशी बोलताना तू गप्प ऐकायच, अजिबात बोलायचे नाही, बोल, आहे का मंजूर?” राहुल अजून असमंजस मध्ये होता, पण हो बोलण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता म्हणून हो बोलला.
तो कॉन्फरन्स करून विधि ला फोन केला, इकडे राहुल त्यांच संभाषण ऐकत होता.

Create your website at WordPress.com
Get started